आजगांवच्या देविदास आजगांवकरच C.A परीक्षेत दैदीप्यमान यश…!

सावंतवाडी : प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून घेऊन त्याने हे यश संपादन करुन आजच्या विद्यार्थ्यांंसमोर एक आदर्श ठेवला आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता 1 ते 4 आरवली बांधवाडा ) या शाळेत, नंतर इयत्ता 5 वी ते 7 वी चे शिक्षण जि. प. केंद्रशाळा आजगांव न.1, त्यानंतरचे 8 वी ते 10 वी अ. वि. बावडेकर विद्यालय शिरोडा येथे झाले आहे आणि नंतरचे शिक्षण कोल्हापूर येथे झाले .

वडिलांचे छत्र वयाच्या सहाव्या वर्षी हरपलेल्या या विद्यार्थ्याने जे दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे. देविदास आजगावकर हा आजगांव धाकोरे शाळा न.1 मधील शिक्षिका शुभांगी आजगांवकर यांचा मुलगा आहे. देविदासने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.