शिक्षक भारतीच्यावतीने कुडाळत २१ ला भरगच्च कार्यक्रम : कपील पाटील यांची उपस्थिती

कुडाळ: शनिवार दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी मराठा हॉल कुडाळ येथे दु. ३.३० वा. शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षकांसाठी सभेचे आयोजन केले आहे. यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार सन्मा. धनाजी पाटील, महाराष्ट्रातील शिक्षक शिक्षकेतरांचे बुलंद आवाज आमदार श्री. कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष श्री संजय वेतुरेकर आणि जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.

गेले वर्ष बॅरिस्टर नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष होते आणि 21 जानेवारीपासून कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे. म्हणून शिक्षक भारतीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्राध्यापक सन्माननीय श्री. प्रवीण बांदेकर यांचा बॅरिस्टर नाथ पै पुरस्काराने, तर संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ मधील प्राध्यापक डॉक्टर अनंत नाना लोखंडे, माजी सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ सहयोगी प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख संत राव महाराज महाविद्यालय कुडाळ यांचा प्राध्यापक मधु दंडवते पुरस्काराने सन्मान होणार आहे. तरी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर आणि शिक्षण चळवळीतील सर्वांना उपस्थित राहावे असे आवाहन शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.