देवगड : देवगड शहर रिक्षा मालक संघाच्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष यांना देवगड शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा व व मोकाट सोडलेल्या गुरांचा बंदोबस्त करावा, या संदर्भात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, देवगड जामसंडे शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम बंद केली आहे. परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद पुन्हा एकदा वाढला आहे. त्याचा नागरिकांना तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी 13 ऑगस्ट रोजी देवगड कॉलेज रोड येथे रिक्षा समोर कुत्रा आडवा आल्याने मळई येथील आपल्या सासरवाडीला जाणाऱ्या संतोष केळुसकर यांची रिक्षा पलटी होऊन रिक्षांमधील नातेवाईकांना दुखापत झाली. व त्यांना देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. परंतु संतोष केळुसकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारांसाठी त्यांना कणकवली हलविण्यात आले.
यासर्व घडलेल्या प्रकारचा आपण गांभीर्याने विचार करावा व शहरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या व गुरांचा बंदोबस्त नगरपंचायत मार्फत करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देवगड शहर रिक्षा मालक चालक संघटनेच्या वतीने देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना देण्यात आले. यावेळी रिक्षा चालक-मालक संघाचे अध्यक्ष अनंत वाडेकर माजी अध्यक्ष अनिल बांदकर रवींद्र कांदळगावकर सिद्धार्थ नारायणकर केतन कुबडे दाजी राजम रवींद्र गिरकर आधी उपस्थित होते.





