आजारपणाचं कारण देत शिंदेना मुख्यमंत्री पदावरून दुर केलं जाणार? ; ‘या’ नेत्याने व्यक्त केली शंका

80

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच अनेक नेते आपल्या शंका आणि अंदाज वर्तवताना दिसतात. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा सवाल करत शंका उपस्थित केल्या आहेत.’आजारपणाचं कारण देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन दुर करण्याचे प्रयत्न आहेत अशी शंका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केली आहे. शिंदेऐवजी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याचा डाव तर नाही ना? असा प्रश्न विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणालेत वड्डेटीवार?

‘एकूणच आरोग्याचे कारण देत त्यांना अॅडमिट करायचं, आणि आरोग्याच कारण पुढे करत त्यांच्याकडून राजीनामा घ्यायचा आणि अजित पवारांना मुख्यमंत्री करायचा प्रयत्न तर सुरू नाही ना? अशी शंका घेण्यासाठी पुर्णता वाव आहे. कारण आता जी दोघांची भुमिका आहे, त्यामधुन दिसुन येत आहे.’

‘अधिवेशनातही एकनाथ शिंदे यांचा सहभाग कमी होता. त्यांची उपस्थिती कमी होती. त्यांचं बोलणंही कमी होतं. त्यानंतर सामाजिक कार्यक्रमांना जाणं टाळणं, आराम करण्यासाठी बाहेर जाणं, मग तब्येतीची काळजी घेणं, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, राज्याला त्यांची काळजी असते. त्याचबरोबर मुख्यमंत्री केवळ एका पक्षाचे नाहीत. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं त्याचा खुलासा स्पष्ट होणं हे अपेक्षित आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत