
सावंतवाडी : कोकणातील विद्यार्थी अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले आहेत. येथील निसर्गाने इथल्या व्यक्तींमध्येदेखील अलौकिक गुण बहाल केलेले आहेत , याचे प्रतिबिंब त्यांच्या हातून घडत असलेल्या विविध कामांतून दिसते. जागतिक स्तरावर छाप सोडणारी कलाकुसर कोकणात पहावयास मिळते, असे गौरवोद्गार कोकण विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ, केशव तुपे यांनी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा रविवारी ‘संस्थापक दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत राणी सत्वशीला देवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘इको आर्ट एक्जीबिशन’ भरविण्यात आले. त्याचे उद्घाटनही सहसंचालक डॉ. तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत, प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव तथा अण्णा केसरकर , अॅड.नकुल पार्सेकर, प्रा.अन्वर खान, भरत गावडे, सुभाष देसाई, चित्रकार दादा मालवणकर, भाई देऊलकर, पी. पी. देसाई, मंगेश तळवणेकर, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापक वर्ग, राजमाता सत्वशीलादेवी भोंसले जुनिअर कॉलेज, श्री पंचम खेमराज लॉ कॉलेज, मदर क्विन्स इंग्लिश मीडियम स्कूल या सर्वं शिक्षण संकुलातील शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान इको आर्ट प्रदर्शनाचे संयोजन कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा . व्ही. पी. राठोड सांस्कृतिक विभागाच्या प्रा. सौ. पी. डी. सावंत, प्रा. एम. व्ही. भिसे, प्रा. ए. ए. कांबळे, प्रा. ए. एस. गवळी यांनी केले.






