वेळागर बिच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट अनेक दिवस बंद, ग्रामपंचायतचे दुर्लक्ष – ‘मनसे’च्या आबा चिपकरांचा आरोप.

66

वेंगुर्ला : तालुक्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या शिरोडा वेळागर बिच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट मीटर जळाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ग्रामपंचायत कार्यालय व महावितरणचे किती दिवस दुर्लक्ष असून मच्छीमारीसाठी जाणाऱ्या व स्थानिक लोकांना अधांरातच फिरावंम लागतं. आता मच्छीमारीची हंगाम चालू झाला आहे तसेच गणेश चतुर्थी सण जवळ आला असून  वेळागर बिचकडे अनेक गणेशभक्त विसर्जनास मोठ्या संख्येने उपस्थित असतात म्हणून स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करावेत अशी मागणी येथील मनसेचे माजी तालुका सचिव राजाराम उर्फ (आबा) चिपकर यांनी केली असून रात्रीच्या वेळी ये-जा करताना पर्यटकांनाही नाहक त्रास होतो. ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष
झाले आहे, असा आरोपही चिपकर यांनी केला आहे.