BIG BREAKING… पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये अजित पवारांनी घेतली शरद पवारांची गुप्त भेट.!

67

पुणे : राज्याच्या राजकारणात सध्याची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये चोरडिया यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. काका-पुतण्याच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आल्याचं दिसून आलं आहे.

पुण्याच्या चांदणी चौकातील प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार हे कोरेगाव पार्कमधील चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. अजित पवार यांनी याच वेळी शरद पवारांची भेट घेतल्याचं समोर येत आहे. यावळी अजित पवार यांनी त्यांची सिक्युरिटी घेतली नव्हती.

नेमकं काय घडलं?  

कोरेगाव पार्कमधून अजित पवारांची नेहमीची गाडी बाहेर पडली पण ती रिकामी होती. चोरडिया यांच्या बंगल्यावरून बाहेर पडताना अजित पवार हे दुसऱ्याच एका गाडीमध्ये बसल्याचं दिसून आलं. माध्यमांच्या कॅमेरामध्ये येऊ नये यासाठी अजित पवार हे गाडीत पूर्णपणे झोपल्याचं स्पष्ट दिसतंय. पण ही गाडी चोरडिया यांच्या बंगल्याच्या गेटला धडकली.