
कुडाल : आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी हुमरस येथील प्राथमिक शाळेच्या आवारात ग्रामपंचायत हुमरस आयोजित महाआरोग्य शिबीर संपन्न झाले . सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री लखमराजे भोसले यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. बदलते हवामान जीवनशैली आणि आहार यामुळे शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या आरोग्याच्या बाबतीत सजग राहून वेळोवेळी तपासणी करून घेतली पाहिजे असे आवाहन युवराज लखमराजे भोसले यांनी केले.

अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर यांनी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, पालघर यांच्या वतीने जवळपास दीड लाखं किमतीचे चष्मे ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले व या पुढेही आपण हुमरस ग्रामस्थांसाठी सदैव पाठीशी राहू असेही श्री. पार्सेकर यांनी संगितले.
माझ्या ग्रामस्थांचे निरोगी आरोग्य ही माझ्यासाठी व गावासाठी महत्वाची विकासात्मक गोष्ट आहे. त्यासाठी या शिबिराचे आयोजन केले असे सरपंच सिताराम तेली यांनी प्रस्ताविकातून संगितले.

या शिबिरात स्त्रीरोगतज्ञ म्हणून डॉ.गौरी गणपत्ये तसेच डॉ.करंबळीकर उपलब्ध होते तसेच दंततज्ञ म्हणून डॉ.स्नेहल टक्केकर, नेत्रतज्ञ डॉ.केळकर, डॉ.हर्षल सांगावकर ,रक्त तपासणी साठी महालॅब चे कु.कांचन परब, तसेच माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कु.सोनिया कदम, आरोग्यसेवक श्री तर्फे,सौ.वैदेही पडते,आशा सेविका सौ वैष्णवी हुमरसकर हे उपस्थित होते.
जिहा रुग्णालय ओरोस यांनी व ग्रामपंचायत हुमरस यांनी सर्व रुग्णांसाठी गोळ्या व औषधे मोफत उपलब्ध करून दिली. या सर्वांचे आभार सरपंच सिताराम तेली यांनी मानले.
यावेळी उपसरपंच श्री प्रवीण वारंग,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर सावंत, सिद्धेश नाईक, सौ.शलाका कवठकर, सौ. श्रुती चिपकर, सौ. सुमन कुडकर, सौ. श्रेया मेस्त्री, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परेश वारंग, ग्रामसेवक बापूसाहेब फुंदे, मुख्याध्यापिका सौ.दिप्ती तळवणेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शिवलकर तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व हुमरस ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निलेश तेली यांनी केले.





