अखेर ‘त्या’ कॉलेजकडून बुरखा बंदीचा निर्णय मागे!

91

मुंबई : मुंबईमधील एका नामांकित महाविद्यालयात मुलींच्या बुरखा घालून येण्यावर बंदी घाल्यण्यात आली होती. त्यानंतर या निर्णयाचे पडसाद उमटल्यावर महाविद्यालयाने हा निर्णय मागे घेतलाय. मुंबईतील चेंबूरमध्ये एक घटना समोर आली होती. चेंबूरमधील आचार्य आणि डी.के मराठे कॉलेजमध्ये बुरख्या घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या या निर्णयाच्या विरोधात मुस्लिम विद्यार्थींनींनी आंदोलन केलं होतं.

समाज माध्यमांवर एक व्हिडीयो व्हायरल झाला होता, ज्यात बुरखा घातलेल्या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाच्या गेटमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. महाविद्यालयाला गणवेश बंधनकारक आहे. मात्र, आता महाविद्यालयाने हा निर्णय मागे घेतला आहे.

महाविद्यालयाच्या बुरखा परिधान करण्यावर घेण्यात आलेल्या निर्णयावर विद्यार्थिंनींकडून विरोध व्यक्त कऱण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थिनींनी असंतोष व्यक्त करण्यात आला होता. त्यांनी महाविद्यालय प्रशासनाला मागणी केली होती की, महाविद्यालयाने आम्हाला गणवेश बदलण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी.
यावर महाविद्यालयाने स्पष्ट केलं की विद्यार्थिनींनी बाहेरुनचं गणवेश परिधान करुन यावा. हे प्रकरणाची दखल माध्यमांनी घेतल्यानंतर महाविद्यालयाने हा निर्णय मागे घेतला आहे. महाविद्यालयाच्या बुरखा परिधान न करण्याच्या निर्णयानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यानंतर परिसरा तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे महाविद्यालय परिसरात पोलीसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. वातावरण चिघळू नये यासाठी पोलीस महाविद्यालयाच्या बाहेर गस्त घालत होते.