वेंगुर्ला : बंद असलेली वेंगुर्ला बस फेरी उद्यापासून पुन्हा चालू होणार असल्याचे वेंगुर्ला एस टी व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी आश्वासन दिले आहे. गेली काही दिवस बंद असलेली सावंतवाडी वेंगुर्ला(तुळस मार्गे) संध्याकाळी ४.३० ला सुटणारी बस उद्यापासून पूर्ववत चालू करण्याचे आश्वासन आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी सिद्धेश तेंडोलकर व मळगाव तळवडे ग्रामस्थांना दिले. सदर बस काही दिवस बंद असल्यामुळे संध्याकाळी मळगावमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत होते याबाबत आज आवाज उठवण्यात आला. उद्यापासून जर बस पूर्व चालू झाली नाही तर वेंगुर्ला आगाराच्या सर्व बसेस मळगाव चौकी येथे अडवण्यात येतील असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला यावेळी उदय सावंल, सिद्धेश तेंडुलकर, शंकर सावंत (तळवडे), इम्रान करोल, रमेश पांढरे (निरवडे )अंकुश राऊल,मनीष गवंडे, महेश गवंडे, सत्यजित राऊळ, रुपेश सावंत (तळवडे), हेमंत गोसावी, ज्ञानेश्वर राऊळ आदि उपस्थित होते.





