वेंगुर्ला : वेंगुर्ला शहर सुंदर करायचे असल्यास प्रथम शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा असे मत अॅड. मनीष सातार्डेकर प्रसिध्दी पत्रकातून व्यक्त केले आहे.
वेंगुर्ला शहर सुंदर करायचे असल्यास सर्व प्रथम शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे आवश्यक असून वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील भिंती रंगवत असुन शहरातील रस्त्याकडे व रस्त्यावर पडलेल्या असून याकडे वेगुर्ला नगरपरिषदेचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकरते अॅड मनीष साताबेंकर यानी केला आहे.
वेंगुर्ला शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झालेले असुन रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच कळेनासे झालेले आहे व त्याचा प्रचंड त्रास वेगुर्ला शहर यासीयांना तसेच वाहनचालक व पादचारी लोकांना होत असुन या खड्डेमय रस्त्यामुळे बरेच छोटे-मोठे अपघात झालेले असुन एखादा मोठा अपघात होवून कोणालाही आपला जीव गमवावा लागू शकतो आणि असे झाल्यास त्यास केवळ नगरपरिषद व त्यांचे संबंधीत ठेकेदार तसेच संबंधीत अधिकारी हेच जबाबदार असतील असे मत देखील अँड मनीष साताकर व्यक्त केले आहे.
वेंगुर्ला शहर दाभोलीनाका ते एस.टी. स्टैंड या रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली असुन नगरपरिषदे याकडे दुर्लक्ष होत आहे व त्यामुळे शहरातील नितीना रंग रंगोटी करून शहर सुंदर होणार नाही तर शहर खरोखरच सुंदर करायचे असल्यास शहरातील रस्ते देखील खड्डेमुक्त करायला हवेत तरच पर्यटनाच्या दृष्टीने शहराचा विकास होईल तसेच वेंगुर्ला नगरपरिषद शहरातील नागरीकाकडुन वृक्षकर आकारला जातो. परंतु वेंगुर्ला नगरपरिषदेला शहरात वृक्षरोपण करण्याचा विसर पडलेला आहे. सुमारे चार वर्षापूर्वी बंगुर्ला नगरपरिषदेने वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे पर्यटन महोत्सव आयोजित केला होता व याकरीता स्टेडियममधील बन्याच वृक्षांची कत्तल करण्यात आली होती. चार वर्ष उलटली तरी वेंगुर्ला नगरपरिषदेने सदर ठिकाणी एकही झाड लावलेले नाही. त्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेला वृक्षारोपणाचा विसर पडलेला आहे असे मत देखील अॅड. मनीष सातार्डेकर यांनी व्यक्त केले आहे.
तसेच वृक्षा रोपणावर लाखो रुपये खर्च केलेले दाखवले जातात प्रत्यक्षात मात्र सदर जागेवर एकही झाड जियंत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहर खरोखरच सुंदर करायचे असल्यास वेंगुर्ला नगरपरिषदेने शहरातील रस्ते खड्डेमुक्त करून वृक्षारोपणावर भर द्यावा तसेच केवळ झाडे लावून न थांबता ती जिवंत राहतील ह्याची देखील विशेष काळजी घ्यावी तसच खऱ्या अर्थाने वेंगुर्ला शहर सुंदर होईल असे मत सामाजिक कार्यकर्ते अँड. मनीष सातार्डेकर यांनी व्यक्त केले आहे.





