सावंतवाडी : सातार्डा तर्फे साटेली येथील रामा जगन्नाथ मांजरेकर यांच्या म्हशीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.साटेली गावातून गोव्यामध्ये विद्युत पुरवठा करणारी लाईन तुटून पडल्याने माळरानावर चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला शॉक लागल्याने तिचा या विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याचा आरोप उपसरपंच बाबा कोरगावकर यांनी केला आहे.काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी विजेच्या धक्क्याने एका म्हशीचा मृत्यू झाला होता अशी कोरगावकर यांनी माहिती दिली.अनेक ठिकाणी 33 केव्ही च्या लाईन अशाच खाली तुटून पडले आहेत.यामुळे मनुष्यहानी होऊ शकते.त्यामुळे तुटलेल्या तारा तसेच वीज पुरवठा करणारा तारांना झोपाळे बांधावेत अन्यथा सदरची वीज पुरवठा लाईन चा बंद करा अशी मागणी कोरगावकर यांनी केली आहे.येत्या आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न केल्यास ग्रामस्थांसमवेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरगावकर यांनी दिला आहे.





