कुणकेश्वर सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर यांनी देवगड तहसीलदार यांना या कारणासाठी दिले निवेदन..!

33

देवगड : शेती कर्जाचा सातबारावर बोजा चढविणे तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेचा लाभ न मिळाल्याबाबत लेखी पत्र तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी आर.जे. पवार यांच्याकडे कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर यांनी जेष्ठ मार्गदर्शक नंदकुमार घाटे यांच्या उपस्थितीत लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की , शेतकरी कर्जावर शेतकऱ्यांना शेती कर्जाचा सातबारा बोजा चढविल्यावर कर्जवाटप देण्यात यावे असा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग यांचा आदेश आहे तरी कुणकेश्वर संस्थेमध्ये शेतकऱ्यांचे रक्कम रु.२०००/- ते २० हजार पर्यंत कर्ज असून त्यासाठी सातबारा वरती महसुलाचा रक्कम रु १ लाख ६००००/ हजार पेक्षा कमी रकमेचा बोजा चढविण्याचा जीआर मुळे ) १ लाख ६० हजार रुपयांचा बोजा चढवावा लागतो व सहहिशेदारांच्या संमती लागत असल्याने
शेतकऱ्यांना बोजा चढविण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळे यावर्षी शेतकरी कर्ज उचल परत मिळणार नसल्यामुळे त्यांनी भरणा केलेली नाही. त्यामुळे कर्ज वसुली करण्यास अडचणी येत आहेत.तसेच महाराष्ट्र शासन योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन या योजनेचा लाभ सरकारने शेतकऱ्यांना दिलेला आहे तरी पण या योजनेत बरेच शेतकरी पात्र असून या लाभांपासून वंचित आहेत. या दोन्ही गोष्टींचा शासनाजवळ आपल्या स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकार सोसायटी चेअरमन निलेश पेडणेकर यांनी तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे चेअरमन निलेश पेडणेकर यांच्यासह नागेश आचरेकर सुहास नाणेरकर विश्वनाथ तेली रसिका पेडणेकर नयना आचरेकर रामदास पेडणेकर आधी सदस्य उपस्थित होते.