खर्डेकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा सत्कार..!

61

वेंगुर्ला : गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या बी. के. सी असोसिएशन या माजी विद्यार्थी संघटनेने खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, स. का. पाटील (मालवण) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, वेंगुर्ल्याचे नूतन तहसिलदार ओंकार ओतारी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, बी. के. सी. असोसिएशनचे अध्यक्ष सतीश डुबळे, उपाध्यक्ष बाळू खामकर, सचिव संजय पुनाळेकर, खजिनदार दिलीप गिरप, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुरेंद्र चव्हाण, प्रदीप कुबल यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. शिवराम ठाकूर यांनी सांगितले
बौद्धिक कौशल्य हे आपल्याला प्रगतीच्या उच्च शिखरावर घेऊन जाते. त्यासाठी प्रगतीचा ध्यास धरला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर का, कशासाठी, कसा करता याचे आत्मपरिक्षण करावे.
कष्टाने, खडतर प्रयत्नाने यश मिळते. सध्याच्या काळात चौफेर ज्ञान आवश्यक आहे. यासाठी विविध क्षेत्रात पारंगत व्हा असा संदेश डॉ. आनंद बांदेकर यांनी दिला. तर गुरुचा आदर करा. चिवटपणाची कास सोडू नका आणि आपली प्रगती करा असे आवाहन ओंकारी ओतारी यांनी केले. सतिश डुबळे, संजय पुनाळेकर, दिलीप गिरप यांनी बी. के. सी. असोसिएशनच्या स्थापनेबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात दिलीप गिरप यांना कोकण आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. बी. के. सी. असोसिएशनने महाविद्यालयाच्या विकासात वेळोवेळी हातभार लावून महाविद्यालयाच्या सर्वांगिण प्रगतीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल दौलतराव देसाई यांनी असोसिएशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वामन गावडे यांनी तर आभार डॉ. वसंतराव पाटोळे यांनी मानले.