बांदा : करे योग रहे निरोग हे ब्रीदवाक्य असलेल्या पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती बांदा च्या वतीने बांदा येथे लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी ११ जुलै पासून १ महिना कालावधीचे विशेष योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.लठ्ठपणा , ज्यादा वजन असणे ही आजची गंभीर समस्या आहे.यावर मात करुन या वर्षीच्या येणाऱ्या गणेश चतुर्थीला पर्यंत सुदृढ शरीर प्राप्त करण्याचा संकल्प करत या शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. हे शिबिर 11 जुलै ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत सकाळी 5:30 ते 7:00 व संध्याकाळी 6:00 ते 7:00 या वेळेत आनंदी मंगल कार्यालय बांदा कट्टाकॉर्नर येथे होणार आहे.यात सहभागी होण्यासाठी श्री. शेखर बांदेकर 9823881712 ,संजय नाईक 7038879174 ,अभय सातार्डेकर 9423311553 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन पतंजली योगसमिति बांदा तर्फे करण्यात आले आहे.




