रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत चालकांची होणार नेत्र आणि रक्तदाब तपासणी…!

बांदा : सतत वाहन चालवत असताना चालक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालक आपले काम करत असतात. चालकाचे आरोग्य जर व्यवस्थित असेल तर रस्त्यावर होणारे अपघात कमी होतील. चालक आपली नेत्र तपासणी तसेच रक्तदाब तपासणीकडे दुर्लक्ष करतात. चालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे यासाठी रस्ता सुरक्षा अभियानात आरोग्य तपासणी करण्या येणार असल्याचे अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत इन्सुली आरटीओ तपासणी नाक्यावर वाहन चालकांची नेत्र व रक्तदाब तपासणी करण्यात आली. यावेळी मोटर वाहन निरीक्षक संजयमोहिते निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अमित पडळकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप रासकर, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वरिष्ठ लिपिक ग्लोबल फाउंडेशनचे लक्ष्मण देसाई डॉक्टर आर बी तेली, डॉक्टर प्रणव प्रभू, उमेश गावडे आदि उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली.