अशोक दळवींचे भाजपवरचे आरोप गैरसमजातून : दीपक केसरकर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटात खटके उडायला सुरुवात झाली आहे. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघात तज्ञ स्वीकृत सदस्य निवडीवरून वादाची ठिणगी पडली असून, भाजपचा शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा थेट आरोप शिंदे गटाचे अशोक दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन घेऊन केला आहे.

अशोक दळवी यांनी भाजपवर जोरदार शब्दात हल्ला चढवला याबाबतचे वृत्त मुंबईतील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. याबाबत याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्याबरोबर चर्चा केली असता त्यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले याबाबत अधिक माहिती संबंधितांकडून घेऊन यावर विचार विनिमय केला जाईल असही त्यांनी सांगितले.