देवगड तहसीलदार मध्ये ऑनलाईन दाखले प्रक्रियेत सर्वरचा अडथळा ठरत असल्याने ऑफलाइन दाखले देऊन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करा शिवसेना युवासेना प्रमुख गणेश गावकर यांचे तहसीलदार निवेदन

60

देवगड ;- तहसील कार्यालयातून दिले जाणारे उत्पन्नाचे दाखले सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळीच न मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहावे लागेल आहे.ऑनलाइन प्रक्रियेमध्ये अडथळे येत असल्यास ऑफलाइन पद्धतीने उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी तहसीलदार तथा परिविक्षाधीन (IAS) अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की,देवगड तहसील कार्यालयातून सेतू सुविधा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले देण्यात येतात सध्या स्थितीत शाळा महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरू असून याकरिता आवश्यक असणारे मुख्य दाखले प्रामुख्याने उत्पन्नाचा दाखला, वय अधिवास व अन्य दाखले हे सध्या स्थितीत नेटवर्कचा अभाव व सर्वर डाऊन असल्यामुळे वेळीच उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थी वर्गांचे प्रवेश प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून प्रवेशापासून विद्यार्थी वर्गाला वंचित राहावे लागत आहे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या कार्यालयातून प्रामुख्याने उत्पन्न दाखले हे देण्यास ऑनलाइन अडथळा येत असेल तर ऑफलाइन पद्धतीने उत्पन्नाचे दाखले देण्यात यावे अशी मागणी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी तहसीलदार तथा परिविक्षाधीन (IAS) अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या शिष्टमंडळात  युवासेना देवगड तालुका प्रमुख गणेश गावकर शाखाप्रमुख बाळा कणेरकर, बाळू कावले,रोहन तारी ,दीपक गावकर उपस्थित होते.