देवगडात लोकराजा “राजर्षी” छत्रपती शाहू महाराज यांची १४९ वी जयंती उत्‍साहात साजरी

44

देवगड : देवगडात लोकराजा “राजर्षी” छत्रपती शाहू महाराज यांची १४९वी जयंती संविधानिक विचार मंच देवगडच्‍या वतीने उत्‍साहात सांजरी करण्‍यातआली. या जयंती कार्यक्रमाचे व्‍याख्‍याते इतिहास विषयाचे प्रा.सचिन दहिबांवकर यांनी छ.शाहू महाराज यांचे बालपन ते अठ्ठेचाळीस वर्षा पर्यंतचा जीवन प्रवास उपिस्‍थांसमोर मांडताना छ.शाहू महाराज सामाजिक न्‍याय, शिक्षण आणि समाजातील उपेक्षित घटकांच्‍या सक्षमिकरणाचे खरे प्रणेते आहेत असे यावेळी प्रतिपादन केले. आपल्‍या खुमासदार शैलित छ.शाहू महाराज यांच्‍या विविध कार्यांबाबतीत विश्‍लेषण करत प्रा.दहिबांवकर यांनी उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.

या जयंती वेळी संविधानिक विचार मंचाचे अध्‍यक्ष के.एस.कदम व विविध मान्‍यवरांच्‍या हस्‍ते “राजर्षी” छत्रपती शाहू महाराज यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अपर्ण करण्‍यात आला. यावेळी विचार मंचावर उपनगराध्यक्ष मिताली सावंत, अध्‍यक्ष के.एस.कदम ,सामाजिक कार्यकर्ते उल्‍हास मणचेकर,प्रा.सचिन दहिबांवकर, डॉ.प्रा.निलेश वानखडे, कार्यवाह दिलीप कदम, शेठ म.ग.हायस्‍कूल देवगडचे मुख्‍याध्‍यापक श्री.बोडराखे, पर्यवेक्षक श्री.गस्‍ती,विजय कदम,सुरभी पुरळकर, पुजा जाधव, अॅड.संतोष साळवे,आनंद देवगडकर आदी उपस्थित होते. दहावी व बारावी झालेल्‍या विदयार्थ्‍यांना करिअर विषक मार्गदर्शन करताना प्रदिप कदम यांनी चालूघडामोडी बदलेली आर्थिक व्‍यवस्‍था आणि बदलत चाललेली सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत विदयार्थ्‍यांना बहूमोल असे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमानिमित्‍ताने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी परीक्षेत देवगड तालुका स्‍तरावरील प्रथम तीन क्रमांक प्राप्‍त तसेच विविध प्रवर्गातील गुणवंत विदयार्थी राजश्री इंद्रनिल ठाकूर, वरद सदाशिव सरोळकर, कांचन उल्‍हास कदम, वेदांत संजय सावंत, सिध्‍दांना संदीप शिंगे, नेनिश सुर्यकांत साळूंखे, मृणमयी प्रल्‍हाद गाडेकर, कृघ्‍नवी मोहन बगनाळे, मयुरप्रकाश खुडे, अथर्व अवधूत गोडवे, संभाजी जाकाप्‍पा माने, गोविंद ब्रम्‍हदेव चांभारे, ईयत्‍ता बारावीतील गुणवंत विदयार्थी स्‍वजय चंद्रकांत कदम, अंकूश रविंद्र धरणे, ऋतूजा दिनेश कमळे, आदिती मिलींद कुबल, रोहन दिपक नार्वेकर, सिध्‍देश उदय सावंत, वेदश्री उदय बापट, यशश्री दिपक सुतार, मानसी रमाकांत जुवाटकर, निधी प्रमोद घाडी, हितीशा प्रभाकर वारीक व नवनियुक्‍त जि.प.शिक्षण विभागाचे तालुका समन्‍वयक अशोक जाधव , सेट-नेट उत्तिर्ण झालेल्‍या प्रा.सिध्‍दी कदम, पुण्‍यश्‍लो‍क अहिल्‍याबाई होळकर पुरस्‍कार प्राप्‍त झालेल्‍या सुरभी पुरळकर यांचा भेटवस्‍तू, बुलाब पूष्‍प व संस्‍थेचे गौरव प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्‍यात आला. यावेळी अँड. इंद्रनिल ठाकूर, पी.के.कदम, प्रा.संकेत लब्‍दे, प्रा.संजय कदम, प्रविण डगरे,प्रकाश जाधव, संदिप जाधव, सदिप शिंगे, रविंद्र धरणे, श्री कांबळेआदी उ‍पस्थित होते. वेदश्री उदय बापट यांनी संविधानिक विचार मंचाचा हा उपक्रम सर्वोत्‍तम असल्‍याचे मनोगत व्‍यक्‍त केले. या ch कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.प्रा.निलेश वानखडे, सुत्रसंचालन दिलीप कदम व आभार प्रदर्शन पुजा जाधव यांनी केले.