सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची चोख कामगिरी | 1376 दाखले केले पूर्ण ; सर्व सामान्य व्यक्तींमधून होतेय समाधान व्यक्त

39

सावंतवाडी : सद्यस्थितीत दहावी बारावी मुलांच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे वेगवेगळे दाखले गरजेचे असून ते मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक यांची तहसीलदार कार्यालयातील सेतू मध्ये मोठी गर्दी दिसून येते.आपल्याला लवकरात लवकर दाखला मिळावा यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न असतात.यात सर्व्हर नसणे,net उपलब्ध नसणे अशा तांत्रिक अडचणी उद्भवतात.अशातच शासनाने फर्स्ट इन फर्स्ट आऊट प्रणाली राबविली आणि मोठी गडबड झाली.दाखल असलेल्या दाखल्यामध्ये ज्याची नोंद आधी त्याचा दाखला पहिला.मात्र दाखल असलेल्या दाखल्यात तात्काळ असणाऱ्या दाखल्या बरोबर इतरही दाखले दाखल असायचे.जो पर्यंत पहिला दाखला पुढे जात नाही तो पर्यंत मागील दाखला पुढे पाठवता येत नसल्याने तात्काळ दाखले अडकल्याने एकच खळबळ उडाली.अखेर शासनाने फर्स्ट इन फर्स्ट आऊट प्रणाली बंद केली आणि पध्दत सुरू झाली.यामुळे तात्काळ दाखले देणे अधिकाऱ्यांना शक्य होऊ लागले.

सावंतवाडी तहसीलदार पदी नव्याने नियुक्त झालेले श्रीधर पाटील यांच्याकडे दाखले वेळेत मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.त्यामुळे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी कर्मचाऱ्यांना सक्तसूचना देत लाभार्थ्याला दाखला त्वरित कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहावेत असे सांगितले.तहसीलदार पाटील स्वतः रात्री एक एक वाजेपर्यंत जागून आपल्या डेक्स वरील सर्व दाखले पूर्ण करत आहेत.13 जून ते 26 जून या 14 दिवसात तहसीलदार पाटील यांनी तब्बल 1376 दाखले पूर्ण केले.आपण विद्यार्थी असताना आपल्याला कागद पत्रासाठी करावी लागलेली कसरत लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दाखलांसाठी हेलपाटे मारावे लागू नये ही मानसिकता आचरणात आणत तहसीलदार पाटील यांनी चोखं कामगिरी केली.तहसीलदार पाटील यांच्या या कामगिरीबद्दल विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे