शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…!

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परिषद पुणे, २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कु. समृद्धी कृष्णा गवस हिने ८१.८७ टक्के गुण मिळवून राष्ट्रीय सर्वसाधारणमध्ये जिल्ह्यात व्दितीय आली. त्याचबरोबर ग्रामीण सर्वसाधारणमध्ये पूजा विरु कोळेकर ५४.३६ टक्के गुण मिळवून तालुक्यात व्दितीय आली. तर रिमा रामकृष्ण पंतवालावलकर ५२.३४ टक्के गुण मिळवून तालुक्यात सर्वसाधारण ग्रामीणमध्ये चौथी आली. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) कु. दिक्षा सतिश राऊळ हिने ८४.५६ टक्के गुण मिळवून जिल्ह्यामध्ये १६ वी आली. तर समृद्धी चंद्रकांत राऊळ हिने ८२.५५ टक्के गुण मिळवून जिह्यात २९ वी आली. तर ईशा राजेश मेस्री हिने ८०.५३ टक्के गुण मिळवले ती जिल्ह्यात ३८ वी आली.

या यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूलचे संस्था अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव आर.आर. राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, सर्व पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.फाले, पर्यवेक्षक कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना (पाचवीच्या) व्ही. आर. सावंत, एन. एस. गोसावी, आर .आर . सावंत भोसले, एस. व्ही. कदम, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना पी. एम. मांतोडकर, एस. आर. कारिवडेकर, ओमप्रकाश तिवरेकर, एम. बी. फाले, एस. एस. परुळकर, सौ. पार्सेकर व माळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.