माणगाव : माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगांव संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव माणगांव व इंग्लिश मिडीयम स्कूल माणगांव चे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन बुधवार दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाले. कार्यक्रम चे अध्यक्ष माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष श्री सगुण धुरी तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त वनपाल श्री बाबुराव धुरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री कमलाकर धुरी व ग्लोबल फाऊंडेशन चे संचालक श्री प्रसाद परब सर उपस्थित होते.
श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव माणगांव प्रशालेत नवीन बांधण्यात आलेल्या रंगमचाचे अध्यक्षांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले. उपस्थित मान्यवर व पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कार्यक्रम चा हेतू मुख्याध्यापक श्री गोविंदराव साटम सर यांनी केले. तर संस्था प्रास्ताविक मध्ये संस्था इतिहास सचिव श्री एकनाथ केसरकर यांनी सांगितला. अध्यक्ष प्रमुख पाहुणे व संस्था सदस्याचा व अतिथी चा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या परीचय विद्यालयाचे शिक्षक श्री प्रशांत कांबळी सर यांनी केला. यक्षिणी विद्यालयाच्या वार्षिक अहवाल विद्यालयाचे वाचन शिक्षक श्री सदाशिव सावंत केले. इंग्लिश मिडीयम च्या वार्षिक अहवाल श्रीम. ॲजेलिना डिसोझा यांनी केले.
त्यानंतर वर्षभरात झालेल्या विविध शालेय स्पर्धा चे बक्षिस वितरण पाहुण्यांच्या हस्ते झाले. बक्षिस वितरण अहवाल विद्यालयाच्या शिक्षिका सौ प्रणाली परब यांनी मांडला. तसेच आठवी ते दहावी प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनाही बक्षिस देण्यात आले. श्री बाबुराव धुरी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. श्री कमलाकर धुरी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत माहिती दिली तसेच संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्लोबल फाऊंडेशन चे संचालक श्री प्रसाद परब यांनी सोशल मीडिया चा वापर यावर सुंदर मार्गदर्शन केले. व शाळेत आपण विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यार असल्याचे सांगितले. श्रीम. वर्षा गाळवणकर या मुंबई मध्ये असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांनी आपला शुभेच्छा संदेश पाठवला होता. सदर शुभेच्छा संदेशात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले शिक्षक करत असलेल्या कामांचे कौतुक करुन शाळा व संस्था यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या भौतिक सुविधा मध्ये स्वच्छतागृह ची इमारत दुरुस्ती साठी २५०००/- हजार रुपये मदत देत असल्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात श्री सगुण धुरी यांनी बक्षिस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेने प्रशालेला विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. उपस्थित पालक, ग्रामस्थ यांनी पुढील भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निधी संकलनासाठी आवाहन केले. संस्थेला दिलेल्या देणगीदाराचे आभार मानले. शाळा व शिस्त यावर आपले विचार व्यक्त केले व शाळेत शिस्त आवश्यक आहे असे पडखर मत मांडले.
व्यासपीठावर माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगांव उपाध्यक्ष श्री दत्ताराम जोशी. सचिव श्री एकनाथ केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजयप्रकाश आकेरकर, अंतर्गत हिशेब तपासणीस श्री साईनाथ नार्वेकर, सदस्य श्री चंद्रशेखर जोशी, दत्तदिगंबर धुरी, माणगांव च्या नवनिर्वाचित सरपंच सौ मनिषा भोसले व उपसरपंच श्री बापू बागवे, वा.स. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रशांत धोंड, कला महाविद्यालय प्राचार्य श्री पवार सर, शिक्षक पालक सभा उपाध्यक्ष श्री कांचन मेस्त्री, श्री विनयकुमार आडेलकर, श्री प्रदिप धुरी, श्री सूर्यकांत गावडे, श्री योगेश धुरी, नागेश सावंत, श्री कुडतरकर, श्री उत्तम मेस्त्री, श्री सिताराम परब, बाळकृष्ण धुरी पालक, ग्रामस्थ, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ प्रज्ञा गुंजाळ यांनी केले.कार्यक्रम चे आभार शिक्षिका सौ अंतरा राणे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे बहारदार कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ट्रेडिशनल फॅशन शो व मालवणी दशावतार नाटक यांनी उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी सादर केलेल्या दशावतार नाटकाला समिर म्हाडेश्वर यक्षिणी दशावतार नाटक मंडळाचे सहकार्य लाभले. दशावतार नाटकाने कार्यक्रमाची सांगता झाली.





