सरपंच संदीप मेस्त्री यांच्या प्रयत्नांना यश | कलमठ गावाला मिळाला हक्कचा वायरमन | विजेची समस्या सुटणार…!

66

कणकवली : कलमठ गावासाठी वायरमन म्हणून सिद्धेश धुत्रे यांना नियुक्त पत्र देण्यात आले. कलमठ सरपंच यांचा पाठपुरावा, आमदार नितेश राणे व वीज कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांच्या माध्यमातून आज सरपंच संदीप मेस्त्री यांनी सिद्धेश धुत्रे यांचे वायरमन म्हणून नियुक्त पत्र आणून महावितरण कडे सुपूर्द केले.वीज अधिकारी गिरीश भगत यांच्या हस्ते वायरमन सिद्धेश धुत्रे याला पत्र देण्यात आले. त्यामुळे कलमठ गावाला हक्कचा वायरमन मिळाला आहे. यावेळी उप व्यवस्थापक प्रकाश शिंदे आबा कोरगावकर उपस्थित होते.