तांत्रिक कारण देत अखेर दोन तासांनी टोलवसुली बंद

118

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथील टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली केली जाणार आहे. मात्र जिल्ह्याच्या मधोमध असलेल्या या टोलनाक्यामुळे जिल्ह्यावासीयांना देखील नाहक भुर्दंड टोलचा पडणार आहे.जिल्हावासीयांना टोल मधून मुक्ती द्यावी किंवा जिल्ह्याच्या वेशीवर टोलनाका न्यावा अशी मागणी जिल्हावासीयांकडून गेले काही दिवस सातत्याने होत होती .

मागण्या मान्य होईपर्यंत टोल वसुली बंद करण्यासाठी आज संघर्ष होण्याची चिन्हे होती.यामध्ये टोल संघर्ष समिती सिंधुदुर्ग , शिवसेना उबाठा , काँग्रेस तसेच इतर संघटना यामध्ये सामील होणार होत्या. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे .मात्र आठ वाजता सुरू झालेली टोल वसुली दहाच्या सुमारास तांत्रिक कारण देत बंद करण्यात आली . टोल वसुली करण्यासाठी नेमण्यात आलेली कोरल असोसिएट्स यांच्या अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती दिली .

Byte- राहुल डांगे , कोरल असोसिएटस