कणकवली : तालुक्यातील ओसरगाव टोल नाक्यावर सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुली कारवाई सुरू झाली आहे. टोल वसुलीवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ओसरगाव टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान सकाळी १० वाजल्यापासून विविध राजकीय पक्षाचे नेते ओसरगाव टोल नाका येथे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर मोठे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.? राजस्थान येथील कोरल असोसिएटला कंपनीला ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. ९ जून रोजी याबाबतचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने कोरल एजन्सीला दिले तर १४ जून पासून याची कार्यवाही सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीची कार्यवाही सुरू झाल्यानंतर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.





