सावंतवाडी : आरोंदामध्ये ठिकठिकाणी पावसाचे
पाणी साचत असल्याने पादचारी व वाहन धारक याना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळी हंगामा आताच सुरू झाला असून सुरुवातीच्याच पहिल्या पावसात आरोंदामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारक व पादचारी याना नाहक त्रास सोसावा लागत आहे.पावसाचे पाणी वाहून जाणारे मोरिचे पाईप गेली कित्येक कीती वर्ष साफ न केल्यामुळे माती जाऊन पुर्ण पणे जाम झाल्याने पाणी वाहून जाणे कठीण बनले आहे. त्यामुळे पाणी पुर्ण पणे रस्त्यावर साचुन राहत आहे आणि वाहन चालकांना ही वाहने जपून चालवावी लागत आहेत .कधीही अपघात होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. पाणी साचून राहिल्या मुळे घरांच्या भिंती फुगुन पडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. नागरीकांनी वारंवार संबंधीत खात्याकडे तक्रारी करुन ही कोणीही दखल घेतलेली नाही. याबाबत आता संबंधित विभागाने कार्यवाही न केल्यास आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
Home आंतरराष्ट्रीय आरोंद्यात ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक व पादचारी वर्गातून तीव्र संताप.!





