जिल्ह्यातील दोन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या.!

72

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्याच्या गृह विभागाकडून काढण्यात आले असून यामध्ये राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे बदली आदेश राज्याच्या गृह विभागाकडून पारीत करण्यात आले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी च्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी तात्याराव सोळंकी यांची जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली झाली तर कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांची सहा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या रिक्त होणाऱ्या दोन्ही उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कोणाचीही नियुक्ती अद्याप केलेली नाही. मात्र दोन्ही अधिकाऱ्यांचे काम नाव न ठेवण्यासारखे असल्याची लोकभावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.