कुणकेरीत १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धा…!

सावंतवाडी : कुणकेरी येथे कुणकेरी क्रीडा आणि कला विकास मंडळाच्या वतीने आज १५ जानेवारीपासून जिल्हास्तरीय निमंत्रित दशावतार नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा ७ दिवस चालणार असून त्याची सांगता शनिवार दिनांक २१ जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेत खालील दशावतार नाट्य मंडळ नाटक सादर करतील. नाटकाची वेळ रात्री 7 ते 10 असणार आहे. या स्पर्धेत सादर होणारी नाटके पुढील प्रमाणे आहेत.

१५/०१/२०२२ रोजी हेळेकर दशावतार नाट्यमंडळ (कारिवडे) नाट्यप्रयोग “भिमकी हरण”, १६/०१/२०२२ अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ. (म्हापण) नाट्यप्रयोग “कुर्मदासाची वारी”, 17/01/2023 खानोलकर दशावतार नाट्यमंडळ (खानोली) नाट्यप्रयोग “अखेरचा कौरव”, 18/01/2023 माउली दशावतार नाट्यमंडळ (डिंगणे) नाट्यप्रयोग “कृती विकृती”, १९/०१/२०२२ भावई दशावतार नाट्यमंडळ (कुणकेरी) नाट्यप्रयोग “देवी करनाई महिमा”, २०/०१/२०२२ चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ (चेंदवण) नाट्यप्रयोग “महारथी कर्ण” 21/01/2023 वाव्हळेश्वर नाट्यमंडळ (तेंडोली) नाट्यप्रयोग “वृक्षविरहित फळ” ही नाटके सादर होणार आहेत. तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.