नितीन गडकरींना धमकी देणारा निघाला कुख्यात गुंड…!

नागपूर : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १०० कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन कॉल आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. १०० कोटी रुपये न दिल्यास बॉम्बस्फोट घडवून आणू अशीही धमकी या फोनकॉलद्वारे देण्यात आली होती. दरम्यान, ही धमकी कर्नाटकमधील एका तुरुंगातून देण्यात आल्याचे समोर आले आहे. धमकी देणाऱ्या तुरुंगातील व्यक्तीचे नाव जयेश कांता असे आहे.

याबाबत नागपूर पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे. “केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तरुंगातून धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव जयेश कांता असे आहे. हा आरोपी कुख्यात गुंड असून त्याच्यावर खुनाचा आरोप आहे,” अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.