महावितरणची डोळे झाक चव्हाट्यावर | दोन तासांच्या पावसानंतर अनेक गाव अंधारात..!

63

कणकवली | मयुर ठाकूर : दरवर्षी पावसाळा जवळ आला की सर्वसामान्य माणूस पावसाळ्यात लागणारी साधन सामग्री एकत्र करून ठेवतो. त्याकडे तो डोळेझाक करत नाही. मात्र कणकवली तालुक्याच महावितरण हे पाऊस पडला तरी निष्काळजी असल्याचे दिसून आले. पहिल्या पावसातच महावितरण ची डोळेझाक चव्हाट्यावर आली आहे.

कणकवली तालुक्यातील बऱ्यापैकी गाव ही महावितरणच्या बेफिकिरपणामुळे अंधारमय झाली. कुठे जीर्ण झालेल्या लाईन तुटल्या, तर कुठे झाडांच्या फांद्या लाईनवर आल्या तरी कट न करता तशाच ठेवल्याने मोठे नुकसान झाले. मात्र पाहिलं तर महावीतरण खात हे कायमचं पावसाळ्यात सुशेगात असल्याचे दिसुन येते. दरवर्षी पाऊस पडला आणि वीज वाहिन्यांचे नुकसान झाले की महावितरण ला जाग येते. मात्र अशा प्रकारची परिस्थिती ओढावण्याआधी महावितरण चे अधिकारी, कर्मचारी करतात तरी काय ? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहेत.

मंगळवारी पडलेल्या पावसानंतर अनेक ठिकणी जीर्ण झालेल्या वीज वाहिन्या तुटल्या आणि अनेक गावं अंधारमय झाली. अनेक लोकांच्या लाईट अभावी गैरसोयी झाल्या. कणकवली तालुक्यातील हळवल, शिरवळ, कळसुली सह आजुबाजूच्या गावांमध्ये लाईट नव्हती. तसेच संबंधीत महावितरण चे कर्मचाऱ्यांचा मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ आहे. एकंदरीत वस्तुस्थिती पहिली तर कणकवलीत महावितरणची वीज वितरण व वीज वाहिन्यांची सुरक्षा यावर डोळे झाक ही काय असल्याने ही डोळे झाक आता चव्हाट्यावर आलेली आहे.