माजी सैनिकांच्या घरावर चोरट्याचा डल्ला; ३४ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

43

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील चंद्रशेखर पारधी (रा.सर्वोदयनगर)यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून 34 लाखाचा मुद्देमाल संशयित आरोपीने लंपास केले.आर्मी नोकरींत असून पारधी हे गावी वेर्ले येथे रजेवर आले होते.27 रोजी कुटुंबासह गावी गेले होते.पारधी यांचा भाऊ आज बंगल्यावर आला असता दरवाजाची कडीतोडल्याचे दिसून आले यानंतर शेजाऱ्यांना बोलवून बंगल्या मधील इतर खोल्यांची पाहणी केली
लाकडी कपाट फोडून 20 हजार कॅश 3 ग्रॅम सोन्याचे झूमके,4 कुडी असा एकूण 34 हजारचा ऐवज चोरून नेला. असल्याचे दिसून आले.तसेच पारधी यांच्या बंगल्याशेजारी असलेला सौ शुभांगी नामदेव गोवेकर यांचा बंगल्याचा दरवाजा तोडून पायातील चांदीची जोडवी, चांदीची सरी चोरीस गेली असल्याचे दिसून आले.घटनास्थळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी भेट देऊन पाहणी केली