जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात | १० प्रवाशांचा मृत्यू तर ५५ जण जखमी

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून १० प्रवासी ठार झाले आहेत. तर ५५ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते अशी माहितीही समोर येते आहे. अशात या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. हे प्रवासी अमृतसरहून वैष्णो देवीच्या दर्शनाला चालले होते त्याचवेळी हा अपघात झाला आहे.