बांदा : जय भीम उत्कर्ष मंडळ किनळे व ल. रा . जाधव गुरुजी परिवार यांच्या वतीने ल. रा.जाधव गुरुजी स्मृती महाधम्मरक्खिता पुरस्कार दरवर्षी दिला जातो.धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच विविध उपक्रम राबवणाऱ्या बौद्धवाडी, वस्तीला ,गावांना हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र,धम्म शाल,बुध्द आणि त्याचा धम्म हा ग्रंथ व धनराशी असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
किनळे येथे संयुक्त बुद्ध भीम जयंती साजरी होत असताना या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.या वर्षी दिवंगत वि . रा. आसोलकर यांना मरणोत्तर पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयांना तसेच आयु प्रा.बी.पी.कांबळी आयु.आर जी चौकेकर यांना सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात पुरस्कारविजेत्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. तथागत गौतम बुद्धांच्या २५८५ व्या जयंती निमित्त व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १६५ व्या जंतीनिमित्त बाबासाहेबांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज आणि त्याचा प्रसार याचे महत्व विशद केले.बाबासाहेबांनी केलेले धम्म प्रवर्तन त्यातून झालेले सामाजिक बदल बुद्धांचा महान विचारांची अखंड जगाला असलेली आवश्यकता यावर मंथन करण्यात आले.
यावेळी, भारतीय बौद्ध महासभा सावंतवाडी अध्यक्ष आयु. बी. पी.कांबळी, सचिव आयु. आर.जी. चौकेकर, कोषाध्यक्ष आयु .मिलिंद नेमळेकर , संस्कार विभाग उपाध्यक्ष आयु.मोहन जाधव ,संस्कार विभाग सचिव रमाकांत जाधव ,केंद्रीय शिक्षक ए पी कदम , संघटक दिलीप जाधव, चंद्रशेखर जाधव, व्ही आर आसोलकर ॲड. अशोक जाधव, विजय जाधव, किशोर जाधव आदि मान्यवर व तालुक्यातून बहुसंख्येने धम्म बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आयु.जयंत जाधव सहा .व्यवस्थापक सि.जि. म.सह.बँक फोंडा तर अध्यक्षस्थानी शिक्षक आयु. शंकर जाधव होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्र संचालन व आभारप्रदर्शन आयु सचिन लक्ष्मण जाधव यांनी केले.





