स्विमिंग पूलमध्ये मृत्यूप्रकरणी ठेकेदार – प्रशिक्षकावर गुन्हा दाखल

सावंतवाडी : नगरपालिकेच्या स्विमिंग पूल मध्ये ग्लेन जॉन डिसोजा (वय 19 रा. चराठा) यांच्या मृत्यूप्रकरणी स्विमिंग पूल ठेकेदार शुभम विलास नेवगी व ट्रेनर पंकज शितोळे यांच्यावर फिर्याद दाखल करुन सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सावंतवाडी नगरपरीषदेच्या जिमखाना येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील जलतरण तलाव व व्यायामशाळा व्यवस्थानाचे परिचलन करणेसाठी Public/Private Partnership (PPP) तत्वावर जलतरण तलाव 3 वर्षाकरीता चालविणेस देतांना मक्तेदार शुभम विलास नेवगी, वय 27 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. विठ्ठल मंदीर नजिक, सावंतवाडी यांना घालण्यात आलेल्या अटी व शर्तीचा त्यांनी भंग केलेला असुन सदर ठिकाणी सुरक्षेकरीता सीसीटीव्ही लावलेली नसुन प्रथमोपचाराचे कोणतेही साहीत्य नसल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच मक्तेदार यांनी सदर ठिकाणी लाईफ गार्डची नेमणुक न केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच सुरक्षेकरीता सीसीटीव्ही लावलेली नसल्याचे दिसुन आले, तसेच प्रथमोपचाराचे कोणतेही साहीत्य नसल्याचे दिसुन आले. ट्रेनर पंकज शिवप्रसाद शितोळे, वय 35 वर्षे, व्यवसाय स्विमींग ट्रेनर व जीम ट्रेनर, रा. इन्सुली गावठाण, ता. सावंतवाडी यांनी प्रशिक्षणार्थीकडे व्यवस्थित लक्ष न पुरविल्याने मयतास वेळेत उपचार न मिळाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.