G-20 व स्वच्छ भारत मिशन(ग्रा) अंतर्गत मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम..!

देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत मिठमुंबरी यांच्या माध्यमातून G20 व स्वच्छ भारत मिशन (ग्रा)अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता व स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून प्रसार प्रसिद्धी कार्यक्रम कार्यक्रम रविवार 21 मे रोजी सायंकाळी पाच वाजता देवगड तालुक्यातील मिठमुंबरी समुद्रकिनारा येथे राबविण्यात आला.

मिठमुंबरी समुद्र किनारा येथे स्वच्छतेची शपथ घेऊन मिठमुंबरी समुद्रकिनाऱ्यावर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सिंधुदुर्ग पर्यटनवाढीसाठी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता आवश्यक आहे. यासाठी ही मोहीम G20 अंतर्गत जिल्हा परिषद जिल्हा परिषद व देवगड पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या सहकार्याने या मिठमुंबरी बीचवर राबविण्यात येत आहे. पर्यटन वाढीसाठी समुद्र किनारे स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.आणि ती प्रशासनामार्फत वेळोवेळी केली जाणार असल्याचे यावेळी गटविकास अधिकारी करिष्मा नायर यांनी सांगितले.यावेळी मिठमुंबरी किनाऱ्यावरील 10 प्लास्टिक बॅग कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता मोहीम संपन्न झाल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.

या ठिकाणी वाळू शिल्प ही तयार करण्यात आले होते या सर्वांचा जिल्हा परिषद व देवगड पंचायत समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्य कारी अधिकारी विलास तनपुरे व विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,
मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर,देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे, वनपाल सारीक फकीर, वनरक्षक निलेश साठे, ग्रामसेविका गोळणकर,सचिन जाधव,जि प अधिकारी व कर्मचारी महिला बचतगट,देवगड जामसंडे नगरपंचायत स्वच्छता कर्मचारी व मिठमुंबरी ग्रामस्थ उपस्थित होते.