Airtel नेटवर्क वापरकर्ते हैराण | कॉलिंग सेवा डबघाईला

कणकवली : Airtel हे फास्ट चालणारे नेटवर्क म्हणून वापरकर्ते वापरतात. मात्र अलीकडेच Airtel नेटवर्क डबघाईला आल्याचे चित्र आहे. मागील तीन – चार दिवसांपासून जर airtel कार्ड वरून समोरच्या व्यक्तीला संपर्क केला तर अशावेळी समोरच्या व्यक्तीने फोन उचलल्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीला स्वतःचाच आवाज ऐकू येतो.

कणकवली तालुक्यात airtel ची मोठी समस्या असून तालुक्यातील airtel संबंधित जबाबदार व्यक्ती याकडे लक्ष देऊन तातडीने सुरू असलेल्या समस्या दूर करणार की लक्ष वेधुनही दुर्लक्ष करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.