सावंतवाडी : सहयोग, ग्रामविकास मंडळ गरड माजगाव, या मंडळाने, जनता, विद्यालय तळवडे, च्या सभागृहामध्ये, भव्य शेतकरी, बागायतदार मेळावा आणि कृषी प्रदर्शन, आयोजित केले होते. या मेळाव्यात सुमारे बाराशे शेतकरी तसेच बागायतदार उपस्थित होते.
पहिल्या सत्राचे उद्घाटन दापोली कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, डॉ. प्रमोद सावंत, संचालक – कोकण
कृषी विद्यापीठ दापोली, मनीष दळवी, अध्यक्ष जिल्हा,बँक सिंधुदुर्ग, प्राचार्य डॉ. डी. एल भारमल, तळवडे सरपंच प्राजक्ता गावडे, मंडळाचे पदाधिकारी, शेतकरी बागायतदार बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात चेतन प्रभू यांनी माती परीक्षण व त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना विशद केले. एन. पी. के व मायक्रो न्यूट्रियंट चे शेतकऱ्यांना महत्त्व त्यानी सांगीतले.आधुनिक तंत्रज्ञानातील शेती अवजारे, बी बियाणे कीटकनाशके यांची माहिती श्री हेमंत गुरसाळे यांनी शेतकऱ्यांना दिली.
तिसऱ्या सत्रात डॉ. नितीन सावंत यांनी मस्य शेती विषयी माहिती दिली. गोड्या पाण्यातील माशांची विविध प्रकार शोभिवंत मासे त्यासाठी बाजारपेठ याचीही माहिती दिली. त्यानंतर कॅलिफोर्निया 30 चे सुमित भोसले यांनी, शेळीपालन उद्येाग संदर्भातील कोकणातील संधी या विषयावर व्याख्यान दिले. शेळी ,बकरी यांचे विविध प्रजाती त्यांची वाढ त्यांच्या खाद्याविषयी सखोल माहिती दिली.
त्यानंतर डॉ. विजयकुमार देसाई यांनी आंबा काजू पीक संरक्षण या विषयावर व्याख्यान दिले.आपल्या व्याख्यानात सर्व नवीन कीटकनाशकांचा आढावा त्यांनी घेतला. बाजारातील बोगस कीटकनाशके याविषयी माहिती त्यांनी दिली.
त्याला बळी पडू नका असे आवाहन केले.
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या फळमाशीचा प्रादुर्भाव कसा कमी करावा याविषयी माहिती दिली. झाडाला लागणारा रोटा कसा नियंत्रित करावा याचीही योग्य माहिती दिली. यशवंत गव्हाणे यांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना व सवलती विषयी माहिती दिली .
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनामध्ये 22 स्टॉल लावण्यात आले होते. सावंतवाडी येथील अन्नपूर्णा कोरगावकर यांचा अन्नपूर्णा कृषी सेवा, कुडाळचा प्रभू ऍग्रो, कळंब ॲग्रो, समर्थ अग्रो, पिंगुळी येथील विघ्नेश ऍग्रो, वेंगुर्ला येथील वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचा स्टॉल , वेंगुर्ला येथील प्रसिद्ध एरम यांची दत्तराज नर्सरी, एम ए आय डी सी लिमिटेड रत्नागिरी, लक्ष्मी कृपा इंटरप्राईजेस, ई बर्ड इंटरप्राईजेस ,छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरस ,राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ ) उमेद अंतर्गत महिला बचत गटांचे दहा स्टॉल असे विविध स्टॉल लावण्यात आलेले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी सदस्य , जनता विद्यालय तळवडे चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत तळवडे च्या सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे चे पदाधिकारी सदस्य, उमेदच्या सौ.गुडेकर मॅडम, नाईक व CRP नारायण मालवणकर ,भूषण पेडणेकर ,प्रशांत पडते सौ.अक्षता गोडकर, रामदास गोडकर, प्रसाद गोडकर ,यशवंत गोडकर, संतोष मालवणकर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमात प्रगतिशील शेतकरी, बागायतदारमध्ये तळवडे येथील उत्तम परब होडावडे येथील मंगेश माणगावकर, नेमळे येथील रवी घोगळे,निरवडे येथील तिलोत्तमा गावडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा.दिलीप गोडकर यांनी केले .मेळाव्याचा उद्देश त्यांनी विशद केला .शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न उदा. माकड तसेच गव्यांपासून होणारे शेतीचे नुकसान ,शासन स्तरावर त्याचा बंदोबस्त करण्याचे आवाहन केले. काॅलेज ते शेतकऱ्यांचा बांध ही संकल्पना मांडली.
आभार प्रा.सुभाष गोवेकर यांनी मानले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वैभव खानोलकर व आडाळकर यांनी केले. प्रा. दिलीप गोडकर ,अण्णा देसाई प्रा. एम व्ही कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ ,सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला .मान्यवरांचे स्वागत मंडळाचे पदाधिकारी व सदस्य बाळू धुरी, राजेंद्र बिर्जे, प्रवीण पवार, सचिन बिर्जे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स (RCF), मीनल मोहन कुलकर्णी व डॉ. अमित मोहन कुलकर्णी यांनी आर्थिक सहाय्य केले.





