पाडलोस श्री देव रवळनाथ १० मे ला वर्धापनदिन सोहळा…!

बांदा : पाडलोस श्री देव रवळनाथ मंदिराचा वर्धापनदिन सोहळा बुधवार दि. १० मे २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सकाळी ७ वा. देवतांना स्थान, अभिषेक, विधीवत पूजापाठ, १०.३० वा. सत्यनारायण महापूजा व तीर्तप्रसाद, महाप्रसाद, संध्या ४ वा. स्थानिकांचे भजन, ७ वा. मुंबईस्थित मालवण येथील ‘बुवा’ विशाल मसुरकर यांच्या सुस्वर संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री ९ वा. दत्त माऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा ट्रीकसीनयुक्त ‘भेद कुष्मांडाचा महिला टेंबलाईचा’ नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन पाडलोस ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.