…तर यापेक्षा उग्र आंदोलन करणार | गटनेते शरद ठुकरुल यांचा इशारा

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने शहरातला सर्व कचरा एकत्रित करून ठाकूर यांच्या बागेत डम्पिंग केला जातो. मात्र आजच्या घडीला डम्पिंग केलेला हा कचरा संपूर्णता असावस्त पडलेला आहे.त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. देवगड नांदगाव मुख्य रस्त्यापासून साधारणत: 500 पाचशे मीटर अंतरावर खाकशी तिठा येथे ठाकूर यांची बाग आहे. या बागेत हा कचऱ्याचे सद्यस्थितीत डम्पिंग केले जाते.

डम्पिंग केलेला अस्तावस्त स्वरूपात पडलेला हा कचरा वाऱ्याने रस्त्यावर देखील येत आहे. यावर प्रशासनाचा व सत्ताधारी नगरसेवकांचा अंकुश नाही. देवगड जामसंडे नगरपंचायतीकडून आतापर्यंत तीन ठिकाणी कचऱ्याचे डम्पिंग केले गेले. मात्र आतापर्यत कचरा डम्पिंग केलेली ही तिन्ही ठिकाणी कधी त्यावेळी विरोधकांच्या व आताच्या सत्ताधारांच्या विरोधकांची कायमची डोकेदुखीचं बनल्यामुळे कचरा व्यवस्थापनामुळे देवगड जामसंडे नगरपंचायत कायम चर्चेत राहिली आहे.
आता पावसाळा जवळ येत आहे त्यामुळे तात्काळ या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा या कचऱ्यामुळे साथींच्या रोगांचा फैलाव होऊ शकतो आणि याला जबाबदार सत्ताधारी व नगरपंचायत प्रशासन असेल ? असा आरोप देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला.

नगरपंचायतीत प्रशासनाचे उमेश स्वामी यांनी या कचऱ्याचे दोन दिवसात व्यवस्थापन व्यवस्थित नगरपंचायतीच्या वतीने केले जाईल असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने कचरा व्यवस्थापनाबाबत केलेले हे आंदोलन आम्ही तूर्तास्त स्थगित करत आहोत असे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे भाजप गटनेते शरद ठुकरुल यांनी सांगितले. मात्र दोन दिवसात याची व्यवस्था न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन देवगड जामसंडे भाजपाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, माजी नगरसेवक उमेश कनेरकर, योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, व्ही सी खडपकर, आदी उपस्थित होते.