सावंतवाडी : आरोस येथील विष्णु लाडू घोगळे आणि परिवाराकडून श्री देव इस्वटि ब्राह्मण – पितरझर – श्री देवी माऊली मंदीर नजिक आरोस -गावठण येथे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. सकाळी पुजा, दुपारी महाप्रसाद, संध्याकाळी भजन आणि रात्रौ नाट्य तरंग – गोवा प्रस्तुत ऐतिहासिक नाट्यप्रयोग इथे ओशाळला मृत्यू रात्री 9: 30 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आनंद घोगळे आणि परिवार आरोस- गावठण यांजकडून करण्यात आले आहे.





