सावंतवाडी : भोसले फार्मसी कॉलेजचे प्रा. विनोद मुळे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली असून त्यांचं सर्वात स्तरातून कौतुक केले जात आहे. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमधील फार्माकोलॉजी विभागप्रमुख प्रा. विनोद मुळे यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएचडी प्राप्त केली. प्रा. विनोद मुळे हे कॉलेजच्या स्थापनेपासून कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत फार्माकोलॉजी या विषयावर विविध रिसर्च पेपर सादर केले आहेत.
‘इव्हॅल्युएशन ऑफ मेडिसिनल प्लॅन्ट फॉर अँटीडायबेटिक ऍक्टिव्हिटी इन ऍनिमल मॉडेल्स’ या विषयावर त्यांनी शोधनिबंध सादर केला होता. मधुमेहावर उपयुक्त वनस्पतींचा अभ्यास व त्यांची कार्यशैली हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता.
डॉ. एन. एस. नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही पीएचडी प्राप्त केली असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





