कणकवलीकरांच्या सेवेत लवकरच अद्ययावत अग्निशामक बंब उपलब्ध होणार.!

कणकवली : कणकवली शहरवासीयांच्या सेवेत नगरपंचायतीचा ८९ लाख ९२ हजारांचा नवीन अद्ययावत अग्निशामक बंब लवकरच दाखल होणार आहे. त्यामुळे भविष्यात आगी सारख्या आपत्तीचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत होईल अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेविका मेघा गांगण, विराज भोसले, महेश सावंत, किशोर राणे, अजय गांगण आदी उपस्थित होते.

यावेळी नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायतने गेल्या दोन महिन्यांपूर्वी जुना अग्निशामक दलाचा बंब निर्लेखित केला होता. त्यानंतर नगरपंचायत सरकारकडे नवीन अग्निशामक बंब खरेदीचा प्रस्ताव केला होता. नवीन अद्यावत ८९ .९२ लाखांचा निधी आम्ही खरेदी करत आहोत. त्याला चेस अशोक लेलँड कंपनीची घेण्यात आलेली असून त्याची वर्क ऑर्डर देखील देण्यात आली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात चेस बॉडी बांधून मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या वाहनाचे वजन १९ टन आणि ६ हजार लिटर पाणी आणि १ हजार फोम् असणार आहे. इंजिन पॉवर १८० एचपी, शिडीची लांबी १०.५ मीटर आहे. गाडीच्या केबिनमध्ये चालक अधिक ४ कर्मचारी बसण्याची व्यवस्था आहे. या बंबला पाणी फवारणी २००० लिटर प्रती मिनीट आहे. प्रथोमोपाचार पेटी १० माणसांकरीताआहे, असे समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली अग्निशामक केंद्र २४ तास चालवण्यासाठी जागा भूसंपादन प्रस्ताव केला आहे. भूसंपादन अधिकारी लवकरच संबंधित जमीन मालकांना त्याचे वाटप करणार आहेत.त्यासाठी नगरपंचायतने ४ कोटी ७० लाख दिले आहेत.त्या अग्निशामक दलाच्या गाड्या उभे राहतील.तसेच भोंगा असेल किंवा आपत्ती कालावधीत त्याचा उपयोग होईल, अशी यंत्रणा लावण्यात येणार अग्निशामक दलाच्या गाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी निवास व्यवस्था असेल. जेणेकरून आपत्ती झाल्यानंतर तातडीने अग्निशामक दलाची गाडी रवाना होतील. भूसंपादित जागेवर मुख्याधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांना राहणेचा व्यवस्था केली जाणार आहे,असे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सांगितले.