देवगड : अवैद्य दारू विक्री करत असताना लिंगडाळ गाव येथे बॉब्स लेमन व्होडका 180 मिलीच्या 18 बाटल्या अंदाजे रुपये 900 बिगर परवाना चोरटा दारू विक्री विक्रीचा धंदा करण्याचे उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळवल्याबद्दल नागेश यशवंत लोके (४०) यांच्याकडून जप्त करण्यात आला. या संदर्भात निलेश नानासाहेब पाटील यांनी देवगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना दोन मे रोजी रात्री ७.४५ च्या मनाने लिंगडाळ गाव येथे घडली. यातील आरोपी नागेश लोके यांचे वर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 नुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबतच्या अधिक तपास देवगड पोलीस करत आहे





