दुर्देवी | सुखी संसाराला लागली दृष्ट..? |आंबे वाहतूक करणाऱ्या पिकअपला अपघात | पत्नीने पतीची सोडली साथ

देवगड : देवगड तारामुंबरी येथील सुमित खवळे व पत्नी स्पृहा खवळे हे खवळे दांपत्य देवगड वरून महिंद्रा पिकअप टेम्पो मधून आंबे घेऊन मुंबईला जात होते. मुंबईला जात असताना मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील हमरापुर फाटा हद्दीत गॅस सिलेंडर वाहून नेणारा (MH १२ EQ २२०८) या गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला महिंद्रा बोलेरो पिकअप (MH ०७ AJ २६८२) ची जोरदार पाठीमागून धडक बसून अपघात झाला. हा अपघात पहाटे ४.१५ सुमारास झाला.

या अपघातात बोलोरो पिकअप मधून प्रवास करणाऱ्या सुमित चंद्रकांत खवळे वय 28 राहणार देवगड तारामुंबरी हे गंभीर जखमी झाले. आहेत तर त्यांची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय 24 ही जागीच ठार झाली. गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला बोलेरो पिकअप ची पाठीमागून इतक्या जोराने धडक बसली की बोलेरोच्या समोरील भाग ट्रक च्या मागील बाजूने आत घुसल्याने बोलेरो मधील पती-पत्नी हे दापत्य आत अडकुन पडले. यात सुमित खवळे गंभीर जखमी झाले . तर त्यांची पत्नी दोन्ही वाहनांमध्ये चिरडल्याने जागीच ठार झाल्या आहेत. अपघाताचे वृत्त कळताच कल्पेश ठाकूर हे देवदूत बनवून आले व त्यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, महामार्गावर अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकामध्ये अडकून पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती.मात्र दादर सागरी पोलीस व पेन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त वाहनांना महामार्गावरून बाजूला करून मुंबई गोवा मार्ग वाहतुकीस सुरळीत केला.