बेकायदा दारू वाहतुकी विरोधात बांदा पोलिसांची कारवाई , 31 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

89

बांदा : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी गुजरात येथील दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अकरा लाखाच्या दारू सह तब्बल ३१ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बांदा तपासणी नाक्यावर करण्यात आली. प्रदीप कुमार श्री भगवती प्रसाद, मोहम्मद शबीर वहीदीभाई इंद्राशी दोघे ही राहणार राजकोट गुजरात अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून असलेला ट्रक जप्त करण्यात यश आले आहे.

याबाबतची तक्रार बांदा पोलीस हवालदार प्रसाद पाटील यांनी दिली आहे. त्यानुसार त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतची अधिक माहिती अशी की, बांदयातून सावंतवाडीकडे बेकायदा दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार असल्याची, माहिती मिळाली होती. त्यानुसार बांदा पोलिसांनी येथील तपासणी नाक्यावर सापळा रचला यावेळी तपासणी केली असता या गाडीत तब्बल अकरा लाखाची दारू मिळून आली तर वीस लाखाची गाडी जप्त करण्यात आली आहे