सावंतवाडी : मळेवाड (जकात नाका) येथे गुरुवार दिनांक २७ एप्रिल रोजी रात्री ठीक ९:३० वाजता श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळ आणि व्यापारी संघटना मळेवाड जकात नाका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच वसंत कानेटकर लिखित व प्रवीण मांजरेकर दिग्दर्शित मराठी रंगभूमीवर गाजलेले, स्वतंत्र सामाजिक संघर्षमय नाटक, दोन मित्रांची अमर कहाणी बेईमान हा नाट्यप्रयोग आयोजित केला आहे. यां नाटकाचे खास आकर्षण सिनेस्टार कु. भूमी शिरोडकर हिच्या सोबत लक्ष्मी महात्मे (पणजी), नंदू नाईक, संजय उक्षेकर, संतोष गावडे, उमेश गावडे, संजय शिरसाट, सुनील नाईक, रमाकांत नाईक, अनिल गोवेकर सर, दीपक नाईक, सर्वेश नाईक, प्रतीक नाईक, बाळू कारूडेकर, विशाल नाईक यांच्या अभिनयाने नटलेल नाट्यपुष्प म्हणजेच बेइमान या नाट्यकृती चा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली कला क्रीडा मंडळ, व्यापारी संघटना मळेवाड जकातनाका व ग्रामस्थांनी केलं आहे.





