वैभववाडी न. पं. मध्ये अत्याधूनिक अग्निशमन बंब दाखल :आ.नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश…

59

वैभववाडी : वाभवे – वैभववाडी न. पं. मध्ये अत्याधूनिक अग्निशमन बंब दाखल झाला आहे. आमदार नितेश राणे यांच्या पाठपराव्यामुळे शासनाच्या अग्निसुरक्षा अभियान ( जिल्हा स्तर ) या योजनेतून तब्बल ५५ लाख किमतीचे हे वाहन नगरपंचायतिकडे प्राप्त झाले आहे. या बंबचा लोकार्पण सोहळा आ. नितेश राणे यांच्या शुभहस्ते लवकरच होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा नेहा माईणकर व उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी दिली आहे.

वैभववाडी तालुक्यात अचानक आग लागली तसेच मोठी दुर्घटना घडली तर आग आटोक्यात आणण्यासाठी काहीच उपाययोजना नव्हती. काही वेळा कणकवली, कुडाळ येथून अग्निशमनच्या गाड्या मागवाव्या लागत होत्या. तोपर्यंत सबंधित व्यक्तीची मोठी हानी होत होती. अग्नीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी तालुक्यात अग्निशमन बंब ची मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली. न. पं. च्या सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिक व व्यावसायिक यांची मागणी आमदार नितेश राणे यांच्याकडे लावून धरली. आमदार नितेश राणे यांनी पाठपुरावा करत शासनाच्या अग्निसुरक्षा अभियानातून नागरिकांची मागणी पूर्ण केली आहे. नगरपंचायत येथे अग्निशमन बंब दाखल होताच नागरिक व व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.