श्री वाघजाई देवीचा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

52

वैभववाडी : करुळ भट्टीवाडी येथे अक्षतृतिया निमित्त श्री वाघजाई देवीचा वर्धापन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त विविध धार्मिक व सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी व ओटी भरण्यासाठी महिला व माहेरवासीनिंनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी वाघजाई देवीचा अभिषेक व होमहवन पार पाडले. त्यानंतर ढोल ताश्याच्या गजरात वाघजाई देवी पादुकांची भव्य मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मिरवणुकीत भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले.

यानिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान महिलांचा फुगडी कार्यक्रम संपन्न झाला. श्री देवी चामुंदडेश्वरी महिला फुगडी मंडळ कविल काट्टे कुडाळ येथील महिलांनी फुगडी सादर करत रसिकांची मने जिंकली. मालवण त्रिंबक येथील श्री देव महापुरुष गोफनृत्य कार्यक्रम पार पडला. शिस्तबद्ध रीत्या सादर केलेले गोफनृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले. यात स्थानिक महिलांनी उस्फुर्त पणे सहभाग घेत कला सादर केली. भट्टीवाडी सेवा मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी करुळ सरपंच नरेंद्र कोलते, सदस्य भास्कर सावंत, सदस्य माधवी राऊत, बबन सावंत, दत्ताराम कदम, मुख्याध्यापक श्री. बांगर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कदम, ग्रामीण मंडळ अध्यक्ष संजय कदम, नम्रता कदम, स्वाति कदम, अनंत कदम, श्री चव्हाण व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वतेसाठी भट्टीवाडी सेवा मंडळ मुंबई व भट्टीवाडी ग्रामस्थ मंडळ करूळ या मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान कदम यांनी केले.