मळेवाड मूरकरवाडी येथे दोन डंपरमध्ये अपघात…

199

सावंतवाडी : मळेवाड मूरकरवाडी येथे दोन डंपरमध्ये अपघात झाला आहे.साटेलीहून रेडीच्या दिशेने डंपरने मायनिंग वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.अशीच वाहतूक करणारा साटेलिहून रेडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने रेडीहून मळेवाडच्या दिशेने येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली.या धडकेनंतर रेडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरने अपघात स्थळावरून पलायन केले.धडक दिलेल्या डंपरचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातामुळे पुन्हा एकदा साटेली मळेवाड रेडी मार्गावर होणारी डंपर वाहतूक चर्चेचा विषय बनली आहे.