असलदे येथील आधार कार्ड अद्यावत कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद | ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य…

76

कणकवली  : तालुक्यातील असलदे येथे आधार कार्ड अद्यावत करण्यासाठी शनिवारी असलदे गावठण येथे अंगणवाडीमध्ये कॅम्प घेण्यात आला होता. सदरचा कॅम्प हा असलदे गावचे उपसरपंच सचिन परब यांनी आयोजित केला होता. या कॅम्पचा असलदे गावठण मधील लहानापासून ते मोठ्यापर्यंत ४१ जणांनी लाभ घेतला.

सदर कॅम्प यशस्वी करण्यासाठी मधुसूदन परब, अजय घाडीगावकर, दिनेश शिंदे, आत्माराम घाडी, परशुराम परब सुनील परब, मारुती घाडी, बापू परब व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सहकार्याने सदरचा कॅम्प यशस्वी झाला.